सल्ला क्र. कृ.वि.के./०९ / २०२४ महिना : सप्टेंबर
कृषि विषयक सल्ला
१. कृषिविद्या :
· कपाशीला लागवडी नंतरचा तिसरा नत्रयुत्त खताचा डोज जर काही कारणा मुळे द्यायचा बाकी राहला असेल तर जमिनी मध्ये ओलावा बघून कोरडवाहू कपाशी करिता एकरी ३० किलो व बागायती करिता ४५ ते ५० किलो युरिया द्यावा. अतिरिक्त नत्राचा वापर केल्यास कपाशी पिक उभट वाढण्याची व तसेच रस शोषण करण्याऱ्या किडीची वाढण्याची शक्क्ता असते. त्या मुळे आपल्या जामीनीच्या व पिकाच्या परिस्तिथी नुसार आपण नियोजन करावे.
· कपाशी मध्ये जर नैसर्गिक कारणा मुळे पाते गळ ,फुल गळ व बोंड गळ होत असल्यास Naphthalene acetic acid (NAA) (३ मिली + १० लीटर पाणी) ची फवारणी करावी.
· कपाशीची अतिरिक्त उभट वाढ होत असल्यास वाढ नियंत्रण साठी मुक्ख्य फांदीचा साधारण १ ते १.५ इंच शेंडा खुडल्यास वाढ थांबेल व अधिक पाते, फुल व बोंड लागण्यास मदत होयील. जर शेंडा खुडणे शक्क्य नसल्यास Mapiquat Choride (१२ मिली + १० लीटर पाणी) किंवा Chlormequat Chloride (१.५ मिली+१० लीटर पाणी ) ची फवारणी करावी.
· कपाशीचे पिक बोंडे भरण्याच्या च्या अवस्थे मध्ये २ टक्के DAP (२00 ग्राम DAP + १० लीटर पाणी) अधिक Magnesium sulphate (२0 ग्राम Magnesium sulphate + १० लीटर पाणी) ची फवारणी केल्यास बोंडगळ कमी होऊन बोडांची चांगली वाढ होण्यास मदत होते.
· सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थे मध्ये २ टक्के युरिया (२00 ग्राम युरिया + १० लीटर पाणी) किंवा १३: ००: ४५ (८० ग्राम + १० लीटर पाणी) ची फवारणी केल्यास दाने भरण्यास व आकारमान वाढण्यास मदत होते.
· तुरी मध्ये वाढ संतुलित ठेवण्या साठी, जास्त फुटवे व फांद्या वाढण्यासाठी, खोड मजबूत होण्या साठी, शेंगाचा लांग वाढवण्यासाठी तुरीचा १ ते २ इंच मुक्ख शेंडा खुडवा. व तसेच सुरुवातीला तूर लागवड करताना जर खत व्यवस्थापन केल गेल नसेल तर सध्या स्थिथीत जनिमी मध्ये ओलावा पाहून एकरी ३० ते ३५ किलो DAP तुरीच्या तास मध्ये द्यावे.
· तूर पिकाची पाने पिवळी पडत असल्यास झिंक व काही प्रमाणता नत्राची कमतरता असण्याची संभावना असते असे आढळून आल्यास झिंक या सुस्म आण्याद्र्व्याची १० लिटर पाण्यात २५ ते ३० ग्राम (विद्राव्य झिंक) ची फवारणी करावी.
२. उद्यानविद्या :
फळपीक
• सामान्यतः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस पर्यंत जाते. या तापमानाच्या स्थितीमध्ये बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. आंबे व मृग बहरांच्या बागांमध्ये फळगळ होताना दिसून येते. यासाठी बुरशीनाशकांसोबत २,४-डी, जिबरेलिक अॅसिड व युरिया, पोटॅशिअम नायट्रेटच्या फवारण्या घेणे आवश्यक आहे. पहिली फवारणी, जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट ०.५ किलो प्रति १०० लिटर पाणी प्रमाणे करावी. दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर, २,४-डी किंवा एनएए १.५ ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट (१३-०-४५) १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी प्रमाणे घ्यावी.
• एक वर्ष वयाच्या संत्रा झाडास १०८ ग्रॅम युरिया किंवा २५० ग्रॅम अमोनियम सल्फेट१५७ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. सोबत २५ ग्रॅम झिंक सल्फेट, २५ ग्रॅम फेरस सल्फेट आणि २५ ग्रॅम मॅंगनिज सल्फेट द्यावे. दोन वर्षांचे झाडास दुप्पट, तीन वर्षांचे झाडास तीनपट व चार किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे झाडासाठी चौपट खताची मात्रा द्यावी.
हळद पीक
• हळद लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी पीक ३ ते ५ पानांवर असताना भरणी करणे आवश्यक असते. या कालावधीमध्ये हळदीस फुटवे व हळकुंड फुटण्यास सुरुवात होते. भरणी केल्यानंतर जर पाऊस नसेल तर पिकास हलकेसे पाणी द्यावे. जेणेकरून भर लावलेली माती निघून पावसाने वाहून जाणार नाही. भरणी केल्यामुळे नवीन येणारी हळकुंडे झाकली जातात त्यांची चांगली वाढ होते. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के वाढ होते. भरणी न केल्यामुळे सूर्यप्रकाशात हळकुंड आल्यास ते हिरवे पडते आणि वाढ खुंटते. गादी वाफ्यावर भरणी करतानादोन गादीवाफ्यामधील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. तसेच गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
३. पिक संरक्षण :
· कपाशीच्या शेतात कामगंध सापळे लावावे (५ सापळे प्रती एकर) व त्यातील दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करणे. या सापळ्यामध्ये सतत २ ते ३ दिवस सरासरी ८ ते १० नर पतंग आढळून आल्यास नियंत्रणाचे योग्य ते उपाय करावे. सापळ्यामध्ये पतंग अडकल्यास ५ % निंबोळी अर्काची / अझाडीऱ्याक्टीन १५०० पीपीम २५ मिली/ १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· फुलामध्ये ५ % पर्यंत प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनोलफॉस २५ % २५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० % प्रवाही २५ मिली / १० लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
· कपाशी पिक सध्या पात्या, फुलावर येण्याची अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये पात्या, फुलांचे नियमित निरीक्षण करावे. अर्धवट उमललेली फुले (डोमकळी) दिसताच अळीसह तोडून नष्ट करावीत.
· कपाशीवर रसशोषक किडी मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रीड १७.८ % २.५ मिली किंवा बुप्रोफेझिन २५ % २० मिली किंवा अॅसिफेट ५० % + इमिडाक्लोप्रीड १.८ % २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. सोबत पिवळे चिकट सापळे ४० प्रती एकर चा वापर करावा.
· कापूस पिकावर आकस्मिक मररोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास झाड खोडांच्या बुडाजवळ दोन बोटात धरून पायाने दाबावे. नंतर कॉपर ओक्झीक्लोरायिट २५ ग्राम अधिक १५० ग्राम युरिया अधिक १५० ग्राम पोट्याश १० लिटर पाण्यात मिसळून आवाळणी करावी.
· सोयाबीन पिकावर खोडमाशीचा आणि पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इथीऑन ५० % १५ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ % ६ मिली किंवा थायोमिथोक्झाम १२.६ % + लॅम्बडा सायलोथ्रीन ९.५ % झेडसी या संयुक्त कीटकनाशकाची २.५ मिली या पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
· सोयाबीनवरील तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट अळी, खोड माशी, चक्री भुंगा या किडींच्या नियंत्रणासाठी, थायमिथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रिन (९.५% झेडसी) हे संयुक्त कीटकनाशक ०.२५ मि.लि. किंवा क्लोरअँट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रामाणात फवारणी करावी.
· सध्या सोयाबीन पिक फुल आणि शेंगाच्या अवस्थेत आहे. अश्या अवस्थेमध्ये फुलांवर आणि शेंगावर विविध रोग आढळून येत आहे. खालील बुरशीनाशके १० लिटर पाण्यातून फवारावी.
§ सर्कोस्पोरा पानावरील ठिपके, पर्ण करपा आणि दाण्यांचा जांभळा रंग – पायरॅक्लोस्ट्रोबीन (२० डब्ल्यूजी) १० ग्रॅम किंवा पिकॉक्सीस्ट्रोबीन (२२.५२ एससी) ८ मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल (१० %) + सल्फर (२५ % डब्ल्यूजी) २५ ग्रॅम किंवा फ़्ल्युक्झॅपायरॉक्झॅड + पायरॅक्लोस्ट्रोबीन ६ मि.लि. किंवा पायरॅक्लोस्ट्रोबिन + इपोक्झीकोनॅझोल १५ मि.लि.
§ शेंगांवरील करपा – टेब्युकोनॅझोल (२५.९ ईसी) १२.५ मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल (१० %) + सल्फर (२५ % डब्ल्यूजी) २५ ग्रॅम
§ तांबेरा – हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) १० मि.लि. किंवा क्रेसोक्झिम मिथाईल (४४.३ एससी) १० मि.लि. किंवा पिकॉक्सीस्ट्रोबीन (२२.५२ एससी) ८ मि.लि.
§ जिवाणूजन्य करपा – कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २० ग्रॅम
· सोयाबीन पिकावर पिवळा मोझाईक वायरसचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्राथमिक अवस्थेमध्ये व्हायरस बाधित झाड उपटून फेकून द्यावे तसेच शेतामध्ये पिवळे चिकट सापळे लावावेत. तसेच तज्ञांच्या सल्ल्यानुसार बिटासायफ्लुथ्रीन + इमिडाक्लोप्रीड ७ मिली किंवा थायोमिथोक्झाम + लेंबडा सायहेलोथ्रीन २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याशी आवळणी करावी.
· तूर पिकामध्ये तापमान व आर्द्रतेच्या वाढीमुळे किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शेंडे गुंडाळणारी अळी, पाने कुरतडणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा क्विनॉलफॉस (२५ एएफ) १.६ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.७ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
· हळद पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्लोरोपायरीफॉस २५ मिली किंवा क्विनोलफॉस २५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
· संत्रावर्गीय पिकांवर (संत्रा/मोसंबी/लिंबू) खालील किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
ü फळातील रस शोषणारा पतंग - प्रौढ पतंगांना आकर्षित करण्यासाठी २० ग्रॅम मॅलॅथिऑन अधिक २०० ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस प्रति दोन लिटर पाण्यात मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण एखाद्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये ठेवून, त्यावर प्रकाशाची व्यवस्था करावी. असे प्रकाश सापळे बनवून बागेत ठेवावेत. गळालेली फळे गोळा करून मातीत दाबून नष्ट करावे. याशिवाय कडुलिंबाच्या ओल्या पानांमध्ये गोवऱ्या टाकून बगीचामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत निरनिराळ्या ठिकाणी धूर करावा.
ü फळमाशी - नर फळमाशीला आकर्षित करून नष्ट करण्यासाठी सापळा तयार करावा. त्यासाठी ५ मि.लि. मिथाईल युजेनॉल अधिक २० मि.लि. मॅलॅथिऑन किंवा २० मि.लि. क्विनालफॉस प्रति १० लिटर पाण्यात द्रावण बनवावे. हे द्रावण रुंद तोंडाच्या बाटलीत ठेवून, अशा एकरी १० बाटल्या झाडावर अडकवून ठेवाव्यात. दर ७ दिवसांनी बाटलीतील द्रावण बदलावे.
ü कोळी - या कीडीचा प्रादुर्भाव दिसताच, डायकोफॉल (१८.५ ईसी) २० मि.लि. किंवा प्रोपरगाईट (२० ईसी) १० मि.लि. किंवा इथिऑन (२० ईसी) ३० मि.लि. किंवा विद्राव्य गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
ü पाने खाणारी अळी – नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) १५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन (२५ ईसी) १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
· मोसंबी/संत्रा पिकावर फायटोपथोरा ब्राऊन रॉट हा फळांचा रोग आहे. सततचा पाऊस, ढगाळ हवामान आणि पानाच्या निचरा न होणाऱ्या शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरवातीला फळांवर पाणी शोषण केल्यासारखे चट्टे दिसून येतात. नंतर मऊ होऊन पिवळट तपकिरी रंगाचे दिसू लागतात. उच्च आद्रतेमुळे फळांच्या पृष्ठ्भागावर्ती बुरशीची वाढ होते. अखेरीस संक्रमित फळ खाली पडतात. ब्राऊन रॉट रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी कॉपरयुक्त बुरशीनाशकाची (१ % बोर्डेक्स मिश्रण किंवा कॉपर ओक्झीक्लोराईड ३० ग्राम किंवा जास्त प्रादुर्भाव असल्यास फोसेटील अल्युमिनिअम किंवा मेफेनोक्झाम एमझेड २५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी द्यावी.
· रासायनिक कीडनाशके वापरण्यापूर्वी लेबल क्लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्लेम शिफारशी नुसार सुरक्षित कीडनाशक तंत्राचा अंगीकार करून कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार फवारणी करावी. अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी करू नये.
४. पशुसल्ला
· तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार जनावरांचे लसीकरण करावे. सप्टेंबर महिन्यात आंत्रविषाराची लस देणे गरजेची असते. त्या पुढील पंधरवड्यात तोंडखुरी आणि पायखुरीची लसीकरण केलेले असावे.
पावसाळ्यात होणारे प्रमुख आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना :
· पोटफुगी: या आजारात जनावराची डावी कुस फुगते. जनावर बेचैन होते. खाणे व रवंथ करणे बंद करते. सारखी उठबस करते. टिचकीने आवाज केल्यास टमटम आवाज येतो.
· हगवण: जनावरास एकसारखे साधे अगर रक्त व शेणमिश्रित पातळ दुर्गंधीयुक्त शौचास होते. जनावर मलूल होते.
👉 शेळी पालन :-
· माज ओळखणारा बोकड गोठ्यापासून वेगळा व दूर ठेवावा.
· पैदाशीच्या योग्य नोंदी ठेवाव्यात.
· पैदाशीच्या माद्यांमध्ये परजीवींचे प्रमाण तपासावे व आवश्यकतेनुसार जंतनिर्मूलन करावे.
· शेळ्यांचे वाढलेले खूर कापून घ्यावेत.
लंपी स्कीन डिसीज :-
प्रतिबंध उपाययोजना :-
· निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून बाधित जनावरे वेगळी बांधावीत.
· या प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्याने आजारी नसलेल्या जनावरांवर, तसेच गोठ्यामध्ये डास, माश्या, गोचीड इत्यादींचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी.
· गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
· साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी.
· बाधित क्षेत्रात गाई म्हशींची विक्री, पशू बाजार इत्यादी बंद करावे.
· बाधित परिसरात स्वच्छता करावी. निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा. याकरिता १ टक्का फॉर्म्यालीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराइट यांचा वापर करावा.
· बाधित जनावराचा मृत्यू झाल्यास, मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी.
👉लसीकरण :-
· प्रादुर्भावग्रस्त भागापासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय, म्हैस वर्गातील जनावरांना पशूतज्ञांकडून रोग प्रतिबंधात्मक लस टोचावी.
· आधीच रोगग्रस्त असणाऱ्या जनावरांना लस टोचण्यात येऊ नये.
· आजाराची लक्षणे जनावरात आढळल्यास पशुपालकांनी त्वरित जवळच्या शासकीय दवाखान्यात कळवून तज्ञांकडून योग्य उपचार करून घ्यावेत.
५. गृहविज्ञान
· सोयाबीन सोंगणी करते वेळी सोयाबीन सोंगणी हातामोज्याचा वापर करावा.
· मशरूम लागवड करण्यासाठी सोयाबीन चे कुटर शेतातून पाच ते दहा दिवसाच्या आत कोरड्या जागी साठवून ठेवावे.
· परसबागेमधील तन काढून टाकावे व आवशक्तेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
राष्ट्रीय पोषण माह (1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर)*
· आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. हे आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम सकस आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि अशा आहारामधूनच निरनिराळे पोषण आपल्याला मिळत असते. त्यामुळे लोकांमध्ये पोषणतत्वांबद्दल आणि आरोग्य बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा पोषण माह सुरू करण्यात आला. याला इंग्लिश मध्ये Nutrition month असेही म्हणतात.
· भारतीय खाद्यपदार्थांच्या विविध स्वादांचा आस्वाद घेताना लोकांना अन्नामध्ये पुरेसे पोषण मिळावे हा यामागचा उद्देश आहे. दीर्घकाळ निरोगी शरीर राखण्यासाठी निरोगी आहार हा मुख्य आधार आहे.
मानवी जीवनात पोषणाचे महत्त्व !
· मानवी शरीरासाठी जगण्यासाठी अन्न हे पूर्णब्रह्म असते. अन्नातून बरेच जीवनसत्व, प्रथिने, लोह, मिनरल इत्यादी घटक जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि उत्तम संगोपनासाठी आवश्यक आहेत ते मिळत असतात. त्यामुळे आपण जर अन्नातून किंवा आपण जो काही आहार घेत असतो त्यामधून मिळणाऱ्या पोषण तत्वांकडे दुर्लक्ष केले तर आहारासंबंधीचे बरेच रोग उद्भवू शकतात.
योग्य पोषणाचे फायदे:-
· आपल्या शरीरात शक्ती निर्माण होते.
· निरनिराळ्या साथीच्या रोगापासून आपला बचाव होतो.
· आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते किंवा वाढते.
· वाढत्या वयाबरोबर येणारे आजार हे लांबणीवर पडतात.
· सकस आहार ग्रहण केल्याने आपले मन सुद्धा प्रसन्न आणि सकारात्मक राहते.
· योग्य पोषणामुळे आपले आरोग्य चांगले राहून वयोमर्यादा वाढते.
६. विस्तारशात्र
· शेतकरी बांधवांनी १८०० १२३ २१७५ किंवा १४४२६ या टोल फ्री नंबर वर कॉल करून शेती विषयक माहिती मिळवावी आणि किसान सार्थी या पोर्टल वर आपली नोंदणी करावी.
· रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले शेतकरी वरील नंबर वर कॅल करून आपले प्रश्न विचारू शकतात.
**********